"संत म्हणजेच सज्जन, दयावंत आणि आचारवंत" – हीच आमची खरी ओळख.
आम्ही एक कट्टर *मानवधर्म वादी* संस्था आहोत, जी कोणत्याही जात, धर्म, वर्ग, लिंग या पलीकडे जाऊन केवळ *मानवतेचा प्रचार व प्रसार* करते.
आमचा उद्देश फक्त एकच – *माणूसपण टिकवणे*, आणि समाजात *प्रेम, दया, सहिष्णुता आणि नीतीमूल्ये* जोपासणे.
प्रत्येक संताचे जीवन हेच एक *जगण्याचे शास्त्र* असते. त्यांचं सज्जनता, करुणा आणि आचारधर्म आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे.
आम्ही या तत्वांना केंद्रस्थानी ठेवून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करतो.
आमच्या उपक्रमांमध्ये समाविष्ट आहे:
* मानवतेसाठी मोफत सेवा आणि उपक्रम
* संतविचार प्रचार आणि प्रसार
* सामाजिक एकतेसाठी संवाद आणि कार्यशाळा
* नैतिक शिक्षण, संस्कार व समाजजागृती
*आमचं स्वप्न:* एक असा समाज घडवणे जिथे *प्रत्येक माणूस माणसाशी माणुसकीने वागेल.*
👁 Vision (दृष्टीकोन)
"जगातील प्रत्येक व्यक्तीला धर्म, जात, पंथ, वंश, भाषा या पलीकडे जाऊन मानवतेच्या एकतेत जोडणे आणि सहविचाराने, प्रेमाने जगणे शिकवणे."
🎯 Mission (उद्दिष्ट)
मानवतेचे मूळ मूल्य समाजात रुजवणे
कोणत्याही प्रकारच्या भेदभावाविरोधात आवाज उठवणे
सेवाभावी कार्यातून गरजूंना मदत करणे
तरुण पिढीत सहिष्णुता, करुणा आणि सामाजिक जबाबदारी वाढवणे
डिजिटल आणि ग्राउंड स्तरावर एक मानवता-आधारित चळवळ उभारणे
जगद्गुरू श्री. यशवंतजी महाराज गारगव्हाण
"संत शांतामाई गारगव्हाण"
अनुष्ठान•गारगव्हाण येथे दिनांक- 10/06/2015 ते दिनांक- 10/06/2025 आनंद दत्त व निजनाम व परनाम व ब्रम्ह विष्णू महेश नामस्मरण 10 वर्षांत 18,225,000 वेळेस स्मरण करून श्री गुरूचरित्र ग्रंथाचे पारायण केले आहे.[दिनांक- 25/06/2025]
VID-20250624-WA0003.mp4
बिजा होम हवन संस्कार राष्ट्रसंत श्री प्रेम महाराज गारगव्हाण
महत्त्वाचे•
श्री दत्त [वाघाई देवी] देवस्थान गारगव्हाण येथे दिनांक- 12/12/2023 रोजी अखेर जिवंत संजीवन समाधी घेणार नाही असे ठाम निर्णय घेतला आहे. पोलिस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केले आहे.